आपला जिल्हाक्राईम
शेतकऱ्याची आत्महत्या — अतिवृष्टी व रेल्वे प्रकल्पामुळे झालेले नुकसान ठरले कारण?

आरमोरी, प्रतिनिधी :-
आरमोरी तालुक्यातील मौजा इंजेवारी येथील गजानन नामदेव लाकडे (वय ५५) या शेतकऱ्याने आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाकडे यांच्याकडे असलेली काही शेती रेल्वे प्रकल्पासाठी संपादित झाली होती. त्यानंतर उरलेल्या शेतीवर त्यांनी कसब केले, मात्र अलीकडच्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या पिकांचे — विशेषतः धानाचे — मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आर्थिक संकटामुळे ते काही दिवस मानसिक तणावात होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.



