गडचिरोली, प्रतिनिधी :-
धानोरा नगरपंचायतीत काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला असून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि ११ नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नागपूर येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात हा प्रवेश पार पडला. या घडामोडीमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धानोरा नगरपंचायतीचे काँग्रेसचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि ११ नगरसेवकांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला. भाजपचे ज्येष्ठ नेते ललितजी बरछा यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात असून, धानोरा नगरपंचायतीतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसच्या स्थानिक संघटनालाही या पक्षांतरामुळे मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हा पक्ष प्रवेशोत्सव नागपूर येथे मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थिती मध्ये झाला. भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी,जेष्ठ नेते ललित बरंच्छा आदी उपस्थित होते.
पक्षप्रवेशानंतर नव्याने भाजपमध्ये दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत धानोरा शहराच्या विकासासाठी आणि संघटना बळकट करण्यासाठी कार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांचे स्वागत करून आगामी काळात जिल्ह्यात पक्ष अधिक मजबूत करण्याचा विश्वास व्यक्त केला.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button