आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेश

२२ वर्षांच्या अथक संघर्षाचे फलित असलेल्या कारगिल स्मारकात २७ वा कारगिल विजय दिवस उत्साहात

संस्थापक उदय धकाते यांच्या कार्याचा मान्यवरांकडून गौरव

गडचिरोली, प्रतिनिधी :-

कारगिल युद्धात मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद वीर जवानांच्या शौर्य, पराक्रम आणि त्यागाला अभिवादन करण्यासाठी गडचिरोली येथे २७ वा कारगिल विजय दिवस देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ, कारगिल स्मारक समिती आणि माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात जिल्हाभरातील नागरिक, माजी सैनिक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले.

यंदाच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते यांच्या गेल्या २२ वर्षांच्या अथक संघर्षाचा सर्व मान्यवरांनी गौरवपूर्वक उल्लेख केला. गडचिरोली शहरात कारगिल स्मारक उभारण्यासाठी सन २००० पासून शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा, पायपीट आणि संघर्ष करणाऱ्या उदय धकाते यांच्या प्रयत्नांमुळेच २०२२ मध्ये हे स्मारक साकार झाल्याचे वक्त्यांनी नमूद केले. जिल्ह्यात देशभक्तीचे प्रेरणास्थान ठरलेल्या या स्मारकामुळे शहीद जवानांच्या स्मृती कायम जतन झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी इंदिरा गांधी चौकातून माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या कारगिल विजय रॅलीने झाली. रॅलीत शालेय विद्यार्थी, युवक, नागरिक तसेच आमदार डॉ. मिलिंद नरोटे सहभागी झाले. कारगिल चौकातील शहीद स्मारकावर पोहोचल्यानंतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन केले.

यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमात वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, गुणवंत पाल्य आणि विविध पुरस्कारप्राप्त माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार डॉ. अशोक नेते, लेफ्टनंट कर्नल रामनाथ स्वामी, कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे वरिष्ठ महाव्यवस्थापक कृष्णा रेड्डी, नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे,विरपत्नी श्रीमती चंदनखेडे,व्यापारी संघटनेचे घिसूलाल काब्रा, होमराज डोनाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतात उदय धकाते यांनी अथक प्रयत्नामुळे उभारलेले हे कारगिल स्मारक हे केवळ एक स्मारक नसून शहीदांच्या शौर्याची प्रेरणा देणारे राष्ट्रीय स्मृतिस्थळ असल्याचे सांगत, भावी पिढीमध्ये देशभक्तीची भावना जागृत ठेवण्यासाठी उदय धकाते हे 27 वर्षापासून झटत आहे.अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाला विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक, महिला, युवक, विद्यार्थी आणि देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकाश भांडेकर, कालू गोवर्धन, नंदू कुमरे, प्रकाश धकाते, मोबीन सय्यद, सुचिता धकाते,वनिता भांडेकर,महेंद्र मसराम, रुपेश सलामे, बाळू मोटघरे, वैभव रामटेके, राजू डोंगरे, सुचिता कामडी, प्रा. सुनीता साळवे, वनिता धकाते, स्मिता दुधे, प्रमिला कुंभारे, प्रा. पारखी, माधुरी दहिकर, अंजली कुळमेथे, हरबा मोरे,श्रीकांत पतरंगे, अनिल पोहणकर, चंद्रशेखर भडांगे, ऋषी वंजारी (से.नि.), हवालदार डिसेज वालदे (नि.), हवालदार महादेव वासेकर (नि.), हवालदार विनायक गेडाम (नि.)राजू भांडेकर, (नि.) विठ्ठल राऊत (नि.)यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन माजी सैनिक डिसेज वालदे यांनी केले.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker