ताज्या घडामोडीदेश विदेशराजकीय

गडचिरोलीचे खासदार हरवले आहेत?’ सोशल मीडियावरील पोस्टरने खळबळ

निवडणुकीपूर्वी गावागावात दिसणारे खासदार आता कुठे?; कार्यकर्त्यांच्या उपस्थितीवरही सवाल

उदय धकाते,गडचिरोली:-

लोकसभा निवडणुकीपूर्वी गावागावातील लग्नसोहळे, स्वागत समारंभ, बारसे, मुंज, जावळ, तेरवी, चौदावी, नाटक-दंडारी अशा सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांत आवर्जून उपस्थित राहणारे गडचिरोली-चिमूरचे खासदार डॉ. नामदेव किरसान आता जनतेच्या नजरेआड झाले आहेत का? असा सवाल उपस्थित करणारे एक पोस्टर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे.

‘खासदार नामदेव किरसान हे हरवलेले आहेत’ अशा आशयाच्या या पोस्टरमध्ये, निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणारे खासदार निवडून आल्यानंतर मात्र दिसत नसल्याची टीका करण्यात आली आहे. तसेच, निवडणुकीच्या काळात ‘प्रत्येकाची अडचण सोडवू’ असे सांगणारे खासदार आता जनतेच्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी कुठे आहेत, असा सवालही करण्यात आला आहे.

पोस्टरमध्ये ‘मागील एक वर्षापासून खासदार यांचा गडचिरोली जिल्ह्यातील कुठल्याच गोष्टीत सहभाग तर जाऊच द्या, ते दिसत सुद्धा नाहीत’, असा दावा करण्यात आला असून, ‘राजीनामा घ्या, जिल्ह्याची मागणी आहे’, अशा आशयाची घोषणाही करण्यात आली आहे. त्यामुळे या पोस्टरमुळे सोशल मीडियावर राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

‘बैठका किती, जनतेचे प्रश्न किती?’

खासदार झाल्यानंतर डॉ. किरसान यांनी जिल्ह्यातील किती शासकीय बैठका घेतल्या, किती जनतेच्या प्रश्नांवर पाठपुरावा केला आणि त्यातून प्रत्यक्षात किती प्रश्न मार्गी लागले, याचा हिशेब जनतेसमोर मांडावा, अशी मागणी पोस्टरमधून करण्यात आली आहे.

दरम्यान, या टीकेच्या पार्श्वभूमीवर डॉ. किरसान यांची संसदीय कामगिरीही चर्चेत आली आहे. पीआरएस इंडियाच्या उपलब्ध नोंदीनुसार त्यांनी लोकसभेत विविध विषयांवर प्रश्न व मुद्दे मांडले आहेत.  यापूर्वी गडचिरोलीतील स्थानिक कार्यक्रमांत त्यांची उपस्थितीही नोंदवली गेली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील ‘खासदार गायब’ या दाव्याबाबत राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

आता खासदारांकडून उत्तराची अपेक्षा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टरमुळे एक मात्र स्पष्ट झाले आहे—खासदारांनी जिल्ह्यात किती वेळ दिला आणि जनतेच्या प्रश्नांसाठी नेमके काय केले, याचा जाब जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे.

त्यामुळे या टीकेला खासदार डॉ. नामदेव किरसान काय उत्तर देतात आणि गेल्या काळातील आपल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर कधी मांडतात, याकडे गडचिरोलीकरांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक जिंकली, पण जनता हरवली? ‘खासदार किरसान कुठे आहेत?’ पोस्टरने गडचिरोलीत राजकीय खळबळ मात्र उडाली आहे.

गडचिरोली चे खासदार हरवले आहे..?

निवडणुकीपूर्वी जे सहसा लगीन, स्वागत सोहळा,बारसा, मुंजे,जावळ, तेरवि,चौदावि, नाटक, दंडारीत  दिसायचे

      निवडून आल्यावर पार गायबच झाले राव.

जिंकल्यावर ते अन त्याचे कार्यकर्ते सांगायाचे लयी शिकला हाय आपल्या परतेक अडचण सोडवल…गांधी टोपीच्या रुपात बापू भेटल्याचा आव आणत होते.ते भी गायब झाले.

यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विकास वर गंभीर परिणाम होत असल्याने जिल्ह्यातील सोशल मीडिया वर काँग्रेस चे खासदार डॉ. नामदेवराव किरसान हे यांची चर्चा जोरदार सुरु आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker