ताज्या घडामोडीसामाजीक
मनीष जेठाणी यांच्याकडून विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण
विवेकानंद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्वखर्चातून पाठ्यपुस्तके उपलब्ध

वरोरा, प्रतिनिधी :-
वरोरा येथील विवेकानंद उच्च प्राथमिक शाळेतील काही विद्यार्थ्यांना आवश्यक पाठ्यपुस्तके उपलब्ध नसल्याची बाब निदर्शनास येताच, वरोरा नगरपरिषदेचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती मनीष जेठाणी यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून पुस्तकांची व्यवस्था करून विद्यार्थ्यांना त्यांचे वितरण केले.
यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे महत्त्व पटवून देत मन लावून अभ्यास करण्याचे आवाहन करण्यात आले. आपल्या बालपणीच्या संघर्षाची आठवण सांगताना जेठाणी म्हणाले, “पुस्तकाचे महत्त्व आणि त्यासाठी पालकांना करावा लागणारा संघर्ष मला स्वतःच्या अनुभवातून माहीत आहे. एका विद्यार्थ्यालाही पुस्तकाअभावी शिक्षणात अडचण येऊ नये.”
“हे पुस्तक केवळ भेट नसून तुमच्या हातातील शस्त्र आहे. त्याचा योग्य उपयोग करून मोठे व्हा आणि भविष्यात गरजू विद्यार्थ्यांना तुम्हीही मदतीचा हात द्या,” असे आवाहनही त्यांनी केले.



