निवडणूकमहाराष्ट्र
खा. डॉ. अशोकजी नेते यांची भाजपाच्या स्टार प्रचारकपदी निवड
गडचिरोली,प्रतिनिधी :-
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशतर्फे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली असून, या यादीत माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री खा. डॉ. अशोकजी नेते यांचा समावेश करण्यात आला आहे.
या नियुक्तीमुळे पक्षातील आदिवासी नेतृत्वाला नवे बळ मिळाले असून, गडचिरोली–चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना खा. डॉ. नेते म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास ही माझ्यासाठी गौरवाची आणि प्रेरणादायी जबाबदारी आहे. ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडणार असून, पक्षाच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या प्रयत्नांचा निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येईल.”
डॉ. नेते हे संघटनशक्ती, विकासदृष्टी आणि जनतेशी असलेल्या थेट संपर्कासाठी प्रसिद्ध असून, आदिवासी समाजातील प्रबोधन, शिक्षण आणि राजकीय सक्षमीकरण या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.



