गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्हा नियोजन समितीवर दोन नामनिर्देशित सदस्य आणि आठ विशेष निमंत्रित सदस्य अशा एकूण दहा जणांच्या नियुक्तीला महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय ३ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार, विधानमंडळ किंवा संसद सदस्यांमधून नामनिर्देशित सदस्य म्हणून आमदार धर्मरावबाबा आत्राम आणि आमदार मिलिंद नरोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले विशेष निमंत्रित सदस्य म्हणून डॉ. संगीता राऊत, डॉ. नामदेव उसेंडी, कृष्णा गजबे, किरण नागदेवे, सदानंद कुटे, वर्षा मोरे, राकेश बेलसरे आणि संदीप ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे) अधिनियम, १९९८ मधील तरतुदींनुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव यांनी संबंधितांच्या निदर्शनास हा आदेश आणण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
या नियुक्त्या शासनाकडून रद्द होईपर्यंत किंवा सध्याच्या मंत्रिमंडळाचा कार्यकाळ संपेपर्यंत, यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत कायम राहणार आहेत.
या नियुक्त्यांमुळे जिल्ह्याच्या विकासकामांचे नियोजन आणि विविध विकासविषयक प्रश्नांवर समितीच्या माध्यमातून चर्चा होण्यास मदत होणार आहे.
Back to top button