गडचिरोली, प्रतिनिधी :-
भारतीय जनता पार्टी विदर्भ प्रदेशाच्या वतीने नागपूर येथे आयोजित ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ पदयात्रेत सहभागी होण्यासाठी गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते गुरुवारी खासगी ट्रॅव्हल्स व विविध वाहनांनी नागपूरकडे रवाना झाले.
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा ताफा नागपूरकडे रवाना झाला. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी वाहनांना हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भाजपा नेते ज्येष्ठ भारत खटी, आमदार नरोटे यांचे स्वीय सहाय्यक चेतन भाऊ गोरे, केतन बुरांडे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानू भाऊ उपाध्ये, भाडभिडी पंचायत समिती क्षेत्रप्रमुख विनोद किरमे, रेगडी पंचायत समिती क्षेत्रप्रमुख पलाश घरामी, सुमेन विश्वास, दिनेश मुजुमदार, संदीप भोवरे, सुकंठ राय, देवाजी सातपुते, संदीप गव्हारे, रमेश लेकलवार, राजू सातपुते, विलास सावकार वडेट्टीवार, शुभम दास यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागपूरकडे रवाना झाल्याने या पदयात्रेत गडचिरोलीचा सहभाग लक्षणीय ठरणार असल्याचे चित्र आहे.
Back to top button