
गडचिरोली, प्रतिनिधी :-
आज सकाळी अंदाजे 8.20 वाजता कार्मेल हायस्कुलच्या शिक्षिका कु. ममता बांबोळे (वय 43) यांचा झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
गडचिरोली शहरातील आयटीआय–गोकुळ नगर बायपास रोड परिसरात राहणाऱ्या ममता बांबोळे या रोजप्रमाणे शाळेत जात असताना हा अपघात घडला. बी फॅशन मॉल समोर, गडचिरोली–चंद्रपूर रोडवर त्यांच्या स्कुटीला घसरून त्या रस्त्यावर पडल्या. त्याच वेळी शेजारून जात असलेल्या आयशर टेम्पोच्या मागील चाकाखाली त्यांचा समावेश झाल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर त्यांना तत्काळ शासकीय वाहनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


