आपला जिल्हानिवडणूक

जिल्ह्यात चार नगरपरिषद सदस्य निवडणुकीला स्थगिती

महाभारत न्यूजचे भाकीत खरे ठरले

गडचिरोली, प्रतिनिधी : –

राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी नगरपरिषदांच्या सदस्य व अध्यक्ष पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र काही नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये विशिष्ट जागांबाबत दाखल अपीलांचे निकाल 22 नोव्हेंबर 2025 नंतर — म्हणजे 23 नोव्हेंबर किंवा त्यानंतर — संबंधित जिल्हा न्यायालयाकडून देण्यात आले असल्याने त्या जागांची निवडणूक नियोजित कार्यक्रमानुसार घेऊ नये, असा महत्त्वपूर्ण निर्णय आयोगाने घेतला आहे.यात गडचिरोली नगर परिषद चा समावेश आहे. गडचिरोली शहरातील या ३ ठिकाणी निवडणूक स्थगित करण्यात आल्या आहेत.

याव्यतिरिक्त, जर अपीलित प्रकरणात अध्यक्ष पदाचा देखील समावेश असेल, तर संपूर्ण नगरपरिषदेची निवडणूक स्थगित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर 2025 रोजी जारी केले आहेत.

या सूचनेचा परिणाम गडचिरोली जिल्ह्यात थेट दिसून आला आहे.

गडचिरोली नगरपरिषद प्रभाग क्रमांक १अ, ४ब, ११ब आणि आरमोरी नगरपरिषद प्रभाग क्रमांक १०अ येथील सदस्य पदाच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. या चार ठिकाणांसाठी निवडणूक सुधारित कार्यक्रमानुसार पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.

महाभारत न्यूजने वर्तवलेले अंदाज यामुळे अचूक ठरले आहेत.

SHARE

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.