गडचिरोली, प्रतिनिधी :-
मुलचेरा येथील कंत्राटी महिला आरोग्य सेविका (C-ANM) यांनी दि. 6 डिसेंबर 2025 रोजी राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे भरती करण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालय स्रोतांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री (वय 50) यांनी वेतनवाढीचे आमिष दाखवून मागील दोन वर्षांपासून संबंधित कंत्राटी आरोग्य सेविकेकडे वारंवार शारीरिक सुखाची मागणी केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मानसिक छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी आज दिनांक 08 डिसेंबर 2025 रोजी पो.स्टे. गडचिरोली येथे Zero FIR दाखल करण्यात आली असून, भारतीय न्याय संहिता कलम 75(2), 78(2) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोस्टे मुलचेरा पोलिस करीत आहेत.
Post Views: 5,147
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.