आपला जिल्हाताज्या घडामोडी

गडचिरोली ओबीसी समाजाला १५ जागांचे आरक्षण

मुंबई,विशेष प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यातील तलाठी पदभरती मध्ये ओबीसी समाजाला १५ जागांचे आरक्षण आमदार डॉक्टर देवरावजी होळी व आमदार कृष्णाजी गजबे यांच्या प्रयत्नांना यश २५ जुलैच्या रात्रीपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.

५८ जागांमधील २० जागा या अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांसाठी आरक्षित करण्यात आल्या असून उर्वरित या १३८ जागांमध्ये पेसा क्षेत्रातील आदिवासी बांधवांसाठी ११४ जागा आरक्षित करण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये होत असलेल्या तलाठी पदभरती मध्ये स्थानिक ओबीसी समाजालाही न्याय देण्यात यावा यासाठी आमदार डॉक्टर देवरावजी होळी व आमदार कृष्णाजी गजबे यांनी विधानसभेमध्ये आवाज उठविला व  महसूल मंत्री यांच्या दालनात बैठक लावून मागणी लावून धरली त्याची फलश्रुती जिल्ह्यातील ओबीसी बांधवांना मिळाली असून १३८ जागांमध्ये १५ जागा ओबीसी बांधवांसाठी आरक्षित करण्यात आल्याची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने आमदार डॉक्टर देवरावजी होळी व आमदार कृष्णाजी गजबे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

या तलाठी पदभरतीच्या अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला  मुदतवाढ देखील मिळाली असून २५ जुलै च्या रात्रीपर्यंत आपले अर्ज स्वीकृत व ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker