नागपूर, प्रतिनिधी :-
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय देताना बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला २ डिसेंबरला झालेल्या मतदानाचे निकाल ३ डिसेंबर 2025 रोजी जाहीर करू नयेत, असा स्पष्ट आदेश दिला आहे. हे निकाल आता २० डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या मतदानानंतर एकत्रितपणे जाहीर करण्यात येणार आहेत.
न्यायमूर्ती अनिल किलोर आणि राजनिश व्यास यांच्या खंडपीठासमोर ही याचिका दाखल झाली होती. आयोगाने काही नगरपालिका आणि नगरपंचायतींचे निकाल आधी जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. यावर न्यायालयाने कडक हरकती घेतल्या.
न्यायालयाने निरीक्षण केले की,३ डिसेंबरला काही भागांचे निकाल जाहीर केल्यास, २० डिसेंबरला होणाऱ्या पुढील निवडणुकीवर त्याचा अनुचित परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन टप्प्यांत निकाल जाहीर करणे योग्य आणि पारदर्शक ठरणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने आयोगाचा निर्णय रद्द केला.
न्यायालयीन आदेश ठळक :-
1. २ डिसेंबर 2025 ला होणाऱ्या निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबरला घोषित करू नयेत, असे उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला निर्देश दिले.
2. हे निकाल २० डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या इतर नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांसोबतच जाहीर करावेत.
3. जर ३ डिसेंबरला काही भागांचे निकाल जाहीर केले तर २० डिसेंबरच्या मतदानावर त्याचा परिणाम होऊ शकतो, म्हणून न्यायालयाने हस्तक्षेप केला.
4. एग्जिट पोल प्रकाशित करण्यास पूर्ण बंदी — २ डिसेंबरच्या मतदानापासून ते २० डिसेंबरच्या मतदानानंतर अर्धा तासापर्यंत कोणतीही एग्जिट पोल माहिती प्रसिद्ध करता येणार नाही.
5. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट (आचारसंहिता) संपूर्ण निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहील.
6. पुढील सुनावणी १० डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.
याशिवाय न्यायालयाने एग्जिट पोलवर पूर्ण बंदी लागू केली आहे. २ डिसेंबरच्या मतदानाच्या सुरुवातीपासून ते २० डिसेंबरच्या मतदानानंतर अर्धा तासापर्यंत कोणताही एग्जिट पोल प्रसिद्ध करता येणार नाही.
तसेच, आचारसंहिता संपूर्ण निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहील, असे देखील आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी १० डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.
Post Views: 19,377
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.