आपला जिल्हाताज्या घडामोडी

शेतकरी कामगार पक्ष भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी लढणार : भाई रामदास जराते

धन्नूर पर्यटन स्थळी मुलचेरा तालुका आठवी बैठक संपन्न

मुलचेरा, प्रतिनिधी :-

खाणी व लोह प्रक्रिया प्रकल्पांच्या नावाखाली जंगल व शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचे प्रयत्न जिल्ह्यात वाढले असून मुठभर भांडवलदारांच्या फायद्यासाठी भूमिपुत्रांवर अन्याय केला जात आहे. या अन्यायाविरोधात शेतकरी कामगार पक्ष सातत्याने आवाज उठवत आला असून यापुढे भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी व्यापक लढा उभारण्यात येईल, अशी ग्वाही पक्षाचे नेते रामदास जराते यांनी दिली.

धन्नूर पर्यटन तलाव केंद्र येथे शनिवारी पक्षाची संघटनात्मक आठवी बैठक पार पडली. बैठकीत औद्योगिक प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेल्या जमिनींच्या संपादनावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. भूमिपुत्रांच्या संमतीशिवाय कोणतेही प्रकल्प राबवू देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

बैठकीस महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, महिला जिल्हाध्यक्षा कविता ठाकरे, तालुकाध्यक्ष चिरंजीव पेंदाम, जिवनकला कुसनाके, कल्पना सडमाके आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाच्या मुलचेरा तालुका समितीचा विस्तार करण्यात आला. तालुका समिती सदस्य म्हणून शांताराम तोडसाम, मिथुन कुळमेथे, किर्तीमंतराव आत्राम, कार्तिक पिल्लेलवार, मधुकर आत्राम, भैय्याजी कडते, मनोज सिडाम, दिलीप मेश्राम, रुपाली रामटेके, कालिदास चौधरी, साईनाथ उरेते, महेंद्र आत्राम, अनिल गावळे, विष्णू मिस्त्री, ईश्वर आलाम, नरेश गोमासे, नान्टू मिस्त्री, शंकर रामटेके, निलकंठ आत्राम, पवित्र सम्मदार, सुरज मडावी, विनोद कन्नाके यांची निवड करण्यात आली.

यावेळी पत्रू नैताम, प्रदीप सेडमाके, अशोक सिडाम, सदाशिव कुळमेथे, भास्कर मडावी, महेंद्र रामटेके, काशिनाथ मडावी, राम वेलादी, श्रीराम आत्राम, रवींद्र मडावी, नारायण पेंदाम, भगवान आत्राम, साईनाथ मडावी, अक्षय सेडमाके, मोहनदास कुसनाके, भैय्याजी सेडमाके, अंबादास कुसनाके, साईनाथ सेडमाके, रवींद्र वनकर, साई बर्लावार, भैय्याजी नैताम, महेश मडावी, रमेश गावळे, संतोष मडावी, सत्यजित रॉय यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत आगामी काळात संघटन विस्तार, जनजागरण मोहीम व भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker