ताज्या घडामोडी

जि.प. हायस्कूल कुरुड येथे माजी विद्यार्थी व शिक्षकवृंद यांचा स्नेह मिलन सोहळा संपन्न

कुरुड (वडसा) :-  

सत्र 1989-95ह्या कालावधी मध्ये जिल्हा परिषद हायस्कूल कुरुड ह्या शाळेत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा व माजी शिक्षक वृंद यांचा सत्कार सोहळा दि.19 जानेवारी2024 ला मा.वकील शेख मुख्याध्यापक यांचे अध्यक्षतेखाली शाळेच्या प्रांगणात पार पडला.

     कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने व राष्ट्रगीताने करण्यात आली. ह्यावेळी माजी शिक्षकवृंद यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाल,श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तीमध्ये मुरलीधरजी बुद्धे सर माजी मुख्याध्यापक,दिलीपजी तुंगीडवार सर, भोमेश्वरजी आंबेकर सर, आत्मारामजी भानारकर सर,जयपालजी मेश्राम सर,  सुखदेवजी गहाणे सर, भुवनेशजी सेलोकर सर यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडलिक ठाकरे यांनी केलेप्रस्तावना कल्पना हजारे यांनी तर मनोगत विजय कावळे, श्रीकांत भर्रे यांनी व्यक्त केले.

अविस्मरणीय व भावनिक क्षणाचे वेळी पत्रकार किशोर मेश्राम,नामदेवराव मिसार जेष्ठ नागरिक व सौ.निर्मला ताई बुद्धे उपस्थित होते.

मनोगत प्रसंगी सर्व माजी विद्यार्थांनी गुरुजन वर्गाप्रति कृतज्ञता व आदर व्यक्त केला तर गुरुजन वर्ग यांनी सुद्धा माजी विद्यार्थी  यांचे जुन्या आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थी वर्गाप्रति आभार व वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत राहून शाळेचे नावलौकिक करत असल्याबाबत अभिमान  व्यक्त करून असेच ऋणानुबंध कायम राहोत अशी सदिच्छा व्यक्त केली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धनंजय फटींग यांनी केले.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी किरण ढोरे, जनाबाई पारधी, नम्रता नाकतोडे, कल्पना हजारे, रत्नाकर मेश्राम, पुंडलिक ठाकरे, श्रीकांत भर्रे,धनंजय फटींग यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी, विद्यार्थीनी गुरुदेव शेंडे, गणेश भजने, विनोद दिघोरे,आनंदराव पिलारे, राजेश्वर भर्रे,चंद्रकांत ठाकरे, मोरेश्वर झुरे, गंगाधर खोब्रागडे, रमेश लाकडे,नाशिक घोडेस्वार,राजेश गणवीर, ईश्वर ढोरे, चांद्रमनी खोब्रागडे, सुरेश ठेंगरी, सुनील ठेंगरी,सरिता उके, खमा देवताळे,योगिता ठाकरे व इतर उपस्थित होते.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker