महाराष्ट्र

आयपीएल वर ऑनलाईन सट्टा (जुगार) खेळणा­यांवर देसाईगंज  पोलिसांची कारवार्ई

गडचिरोली,प्रतिनिधी :-

           सद्या देशात आयपीएलचा सीजन सुरु असुन आयपीएलवर सुरु असलेल्या अवैध सट्टाबाजीवर आळा घालुन कठोर कारवाई करण्याचे निर्देश संपूर्ण जिल्हयातील पोस्टे/उपपोस्टे व पोमके यांना दिलेले आहेत.

         त्या पाश्वभुमिवर दि.01/05/2024 रोजी पोस्टे देसांईगंज हद्दीत आयपीएल सट्टा  खेळवणारे इसमाबाबत खात्रीशिर माहीती मिळाल्याने प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अजय जगताप यांचे आदेशान्वये पोउपनि ज्ञानेश्वर धनगर, पोअं/ विलेश ढोके, संतोष सराटे व विलास बालमवार यांनी देसाईगंज शहरातील विर्शि टी. पाँईट चौक येथे सापळा रचुन  नाकाबंदी केली असता नाकाबंदीदरम्यान टोयोटा कंपनीेचे हायराईडर मॉडेल चारचाकी वाहन क्र. एमएच 33 एसी 5443  येत असल्याचे पाहून सदर वाहन चालकास थांबण्याचे इशारा देवुन वाहन थांबविले असता, पंचा समक्ष चालकाचे नाव व गाव विचारले असता त्यांनी चेतन पुरूपोत्तम मस्के रा. कोरेगांव ता.देसाईगंज असे सांगितले. तेव्हा सदर वाहनाची झडती घेतली त्यामध्ये वाहन चालकाकडे जुनी वापरते दोन मोबाईल व वाहनामध्ये 3,66,900/- रोख रक्कम मिळून आल्याने सदर ईसमास विचारणा केली असता त्यांनी  सर्च  इंजीनच्या साहाय्याने वेबसाईटचा वापर करुन युजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने आयपीएलवर सट्टा खेळत असून चालू असलेल्या खेळावर यावर सट्टा लावल्याचे निदर्शणास आले.

         तेव्हा पंचासमक्ष आरोपीस ताब्यात घेवून त्यांच्याकडून रुपये 3,66,900/- रोख रक्कम व दोन जुने वापरते मोबाईल तसेच टोयोटा कंपनीेची हायराईडर मॉडेल चारचाकी वाहन असे एकुण 16,31,900/- रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपीने हा ऑनलाईन सटटा अन्य एका साथीदाराच्या मदतीने चालु असल्याचे सांगीतले यावरुन पहिजे आरोपी नामे नवीश नरळ रा. शेगांव ता. वरोरा जिल्हा. चंद्रपूर या दोघाविरुध्द पोस्टे देसाईगंज येथे गुन्हा नोंद केला आहे.

यावेळी संपूर्ण जिल्हयातील नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध सट्टेबाजी पासुन दुर राहुन जर कोणी असे अवैध व्यवसाय चालवित असतील त्यांची माहिती पोलीस विभागाला देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी केले आहे.

  सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रविंद्र भोसले यांच्या नेतृत्वात, पोलीस निरीक्षक पोस्टे देसाईगंज. अजय जगताप, पोउपनि ज्ञानेश्वर धनगर हे दाखल गुन्हयाचा पुढिल तपास करीत आहेत.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.