गडचिरोली, प्रतिनिधी :-
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा २९ ऑगस्ट पासून बेमुदत संपाचा निर्धार केला असून या संपमुळे शासकीय यंत्रनेच काम ठप्प पडणार आहे.
राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी शिक्षक यांच्या मार्च २०२३ च्या सात दिवसाच्या संपात न भूतो न भविष्यती असा उद्रेक महाराष्ट्राने अनुभवलेला आहे .या प्रखर आंदोलनाचा सकारात्मक विचार करून राज्य समन्वय समितीसह दीर्घ चर्चा करून माननीय मुख्यमंत्र्यांनी जुन्या पेन्शन प्रमाणे कर्मचारी शिक्षकांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येईल अशी लेखी हमी देऊन सुद्धा या दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासलेला आहे. त्यानंतर १४ डिसेंबर 2023 पासून बेमुदत संपाची घोषणा केली.
अर्थ संकल्पीय अधिवेशनात सुद्धा सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना जाहीर केली परंतु अद्यापही जुनी पेन्शन बाबत शासन निर्णय किंवा अधिसूचना पारित केलेली नाही. त्यामुळे राज्यातील सुमारे साडेआठ लाख सरकारी कर्मचारी संतप्त झालेले आहेत. तसेच केंद्राप्रमाणे ग्रॅच्युईटी द्या, बारा वर्षानंतर सेवानिवृत्ती वेतन अंश राशीकरण पुनर्स्थापना करा, केंद्राप्रमाणे एक नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात/ अधिसूचना द्वारे नियुक्ती प्रक्रिया सुरू झालेल्या कर्मचारी/ शिक्षकांना 1982 ची जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करा, विविध संवर्गात असलेली 40% पदे कायमस्वरूपी नियुक्ती द्वारे भरा, बिना अट अनुकंपा तत्वावर नियुक्त्या द्या, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा इत्यादी विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण राज्यात दिनांक २९ आगष्ट २०२४ पासुन राज्यातील 17 लाख कर्मचारी नाईलाजाने गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 24 पासून बेमुदत संप आंदोलनाचा निर्णय मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या सभेत एक मुखाने घेण्यात आला . त्यानुसार आज जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे मार्फत एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे बेमुदत संपाचे निवेदन सुनिल सुर्यवंशी निवासी उपजिल्हाधिकारी यांचे कडे सादर केलेले आहे.
राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे शिष्टमंडळामध्ये जिल्हाध्यक्ष सुनील चडगुलवार, सरचिटणीस भास्कर मेश्राम ,चतुर्थ सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लतीफ पठाण ,सचिव किशोर सोनटक्के, सहसचिव सिद्धार्थ मेश्राम, दिलीप मेश्राम ,आशिष सोरते, प्रवीण आदे, महेश इंदुरकर , संतोष करपे ,सुरेंद्र चव्हाण,विजय करपते ,राजेंद्र धुडसे अलोने ,पियुष आखाडे इत्यादी उपस्थित होते.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia