ताज्या घडामोडी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे वित्तीय साक्षरता कार्यशाळा

वसंत विद्यालयात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे वित्तीय साक्षरता कार्यशाळा

गडचिरोली, प्रतिनिधी :-

चांदा शिक्षण मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित वसंत विद्यालय, गडचिरोली येथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नागपूर कार्यालयाच्या वतीने वित्तीय साक्षरता कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वतीच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नागपूर कार्यालयाचे सहाय्यक व्यवस्थापक श्री महेश थुल यांनी विद्यार्थ्यांना वित्तीय साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले. डिजिटल वित्तीय साधनांचा वापर करताना – मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, यूपीआय पेमेंट तसेच बँक व्यवहार करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, सुरक्षित व्यवहार कसे करावेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच बचत, गुंतवणूक, आरोग्य विमा व जीवन विमा यांचे महत्त्व त्यांनी विविध ज्वलंत उदाहरणांद्वारे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारण्यात आले व योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सुचिता कामडी, पर्यवेक्षक श्री प्रभाकर मंदूरकर, ज्येष्ठ शिक्षक श्री सतीश धाईत, जिल्हा ग्राहक पंचायत मंचचे जिल्हाध्यक्ष श्री उदय धकाते, रिझर्व्ह बँक नागपूरचे सहाय्यक व्यवस्थापक श्री वैभव बोरुले उपस्थित होते.

या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातून केवळ वसंत विद्यालय, गडचिरोली या शाळेचीच निवड करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विद्यानंद चहांदे यांनी केले तर आभार श्री अनिलकुमार पुरी यांनी मानले. कार्यशाळेसाठी शिक्षक श्री मेघश्याम लांजेवार, कु. तिलोत्तमा सुरपाम, कु. कल्पना कन्नाके, श्री प्रवीण दब्बा, कु. शीतल आडोळे, कु. रितू सुचक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी श्री राकेश हेडाऊ, विभा गावतुरे यांचे सहकार्य लाभले.

या कार्यशाळेत सहभागी सर्व शिक्षकांना रोजनिशी व पेन, तर विद्यार्थ्यांना पारदर्शक परीक्षा पॅड भेटस्वरूपात देण्यात आले. तसेच स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यशाळेला नववी व दहावीचे सुमारे ३०० विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker