निवडणूक

पुन्हा कागदी मतपत्रिकांद्वारे मतदान नाही – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

दिल्ली, प्रतिनिधी :-

 भारतीय निवडणुकांमध्ये कागदी मतपत्रिकांद्वारे मतदानाची मागणी करणारी जनहित याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे पराभूत होणाऱ्या उमेदवारांना हा जोरदार धक्का बसला आहे.

निवडणूक प्रक्रिया दरम्यान ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) संदर्भातील छेडछाड आरोपही फेटाळले.

ईव्हीएमवर विरोधकांचे आरोप निवडणुका हरल्यानंतरच केले जातात. निवडणूक जिंकली, तर ईव्हीएममध्ये छेडछाड झालेली नाही, पण निवडणूक हरल्यानंतर ईव्हीएमवर आरोप केले जात असल्याचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि पी.बी. वराळे यांच्या खंडपीठाचे निरीक्षण.

ईव्हीएमबाबत याचिकाकर्ता डॉ. के.ए. पॉल यांच्या युक्तिवादात काहीही तथ्य नसल्याचे खंडपीठाचे निरीक्षण केले आहे. इलान मस्क यांचे संदर्भ या याचिकेत युक्तिवाद मध्ये करण्यात आले होते. परंतु हे सर्व दावे फेटाळण्यात आले आहे. भारतातील अनेक नेत्यांचे वक्तव्य सुद्धा या याचिकेत पुढे आणले गेले होते.

या निर्णय मुळे नुकतेच देशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत इव्हीम वर प्रश्न चिन्ह लावणाऱ्या अनेक पराभूत न्यायालयात याचिका टाकणार असे जाहीर केले होते. त्या पूर्वीच हा निर्णय आला आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker