आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी
विकासाच्या वाटेवर पल्ली गाव मात्र रस्त्याविना
विकासाच्या वाटेवर पल्ली गाव मात्र रस्त्याविना चिखलमय
उदय धकाते,गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागांच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे चित्र भामरागड तालुक्यातील पल्ली गावाजवळ पाहायला मिळत आहे. पावसामुळे गावाकडे जाणारा रस्ता चिखलमय झाला असून वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे समाज माध्यम च्या वायरल व्हिडिओमधून दिसून येत आहे.

पल्ली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे चिखलाचे डबके निर्माण झाले आहेत. दुचाकी वाहने या चिखलातून मार्ग काढताना घसरत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसते. पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत कठीण होत असल्याचे या दृश्यातून स्पष्ट होते.
https://x.com/uday_dhakate/status/2092498271839428834
एकीकडे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजना आणि कोट्यवधी रुपयांच्या निधीची चर्चा होत असताना, दुर्गम भागातील गावांना आजही पक्क्या व सुरक्षित रस्त्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे या परिस्थितीवरून दिसून येते.
‘यालाच गडचिरोलीचा विकास म्हणायचा का?’ असा सवाल उपस्थित करत पल्ली गावातील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना बारमाही वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
पल्ली, ता. भामरागड येथील या रस्त्याची संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून पावसाळ्यातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]



