आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

उद्या राकाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, अनिल देशमुख गडचिरोलीत

पक्षाचा २५ ऑगस्टला भव्य कार्यकर्ता मेळावा

गडचिरोली, प्रतिनिधी :–

गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता आरमोरी रोडवरील सांस्कृतिक मंगल कार्यालयात भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे, माजी गृहमंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिलभाऊ देशमुख यांच्यासह पक्षाचे अन्य प्रमुख नेते उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

आगामी काळातील पक्षाची भूमिका, संघटनात्मक बांधणी तसेच जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर या मेळाव्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

तरी गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ गण्यारपवार यांनी केले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker