आपला जिल्हाक्राईम

नराधमास फाशी द्या – शिवसेना महिला आघाडीची मागणी 

गडचिरोली, प्रतिनिधी :-

शिवणी येथील असाह्य तरुणीवर लैंगीक अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशी द्या अशी मागणी शिवसेना जिल्हा संघटीका छाया ताई कुंभारे यांनी केली आहे.

नुकतेच तालुक्यातील शिवणी येथील शारीरिक दृष्ट्या कमजोर असलेली तरुणी शौचास गेली होती. छत्तीसगड येथील एक इसम मजुरी काम करण्यास आला होता त्या इसमाने तरुणीला अमानुषपने मारहाण करून जबरदस्तीने अत्याचार केले.

अत्याचार एवढे भयानक होते की तिला नागपूर येथे उपचारासाठी न्यावे लागले.अशा या अमानुष पने मारहाण करून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल करून नराधमाला फाशी ची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदन देऊन केली.

 या मागणीचे निवेदन शिवसेना जिल्हा संघटीका माजी बांधकाम सभापती महिला नेत्या छाया ताई कुंभारे यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जगताप यांना दिले तसेच पोलिस विभागणी महिलांच्या सुरक्षा करिता कठोर पाऊल उचलावे आणि पीडित असाह्य तरुणीला आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली.

  निवेदन देताना शिवसेना जिल्हा संघटीका तथा माजी बांधकाम सभापती छाया ताई कुंभारे नूतन वेलेकर, जोसना राजुरकर, धनश्री पवार,देवयानी मिस्त्री महिला कार्यकर्त्या उपस्थित होते.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker