आपला जिल्हाताज्या घडामोडी
स्वातंत्र्य दिनानिमित्त नगरपरिषदेत उत्साहात ध्वजारोहण

गडचिरोली, प्रतिनिधी :-
भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गडचिरोली नगरपरिषदेत आज सकाळी ७.४५ वाजता देशभक्तीमय वातावरणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. नगराध्यक्षा प्रणोती सागर निंबोरकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
यानंतर राष्ट्रगीताने वातावरण भारावून गेले. कार्यक्रमाला नगरपरिषदेचे नगरसेवक, अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांमध्येही स्वातंत्र्य दिनाचा उत्साह दिसून आला.
“स्वातंत्र्याचा अभिमान मनात ठेवून विकसित आणि सक्षम भारताच्या निर्मितीसाठी आपण सर्वांनी एकजुटीने कार्य करूया,” असा संदेश यावेळी देण्यात आला.



