गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्व. गजाननराव निखारे यांच्या कनिष्ठ कन्या तथा भद्रावती येथील प्रा. रमेश कुंभारे यांच्या पत्नी सौ. वंदना रमेश कुंभारे (वय ५३) यांचे दीर्घ आजाराने नवेगाव, गडचिरोली येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने निखारे व कुंभारे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्या राजू भाऊ निखारे आणि संजू भाऊ निखारे यांच्या भगिनी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा तेजस, कन्या साक्षी, जावई, सून आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गडचिरोली येथील कठाणी नदीच्या तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय हलबा जमात महामंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. उपस्थितांनी स्व. वंदना कुंभारे यांच्या स्मृतींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच शोकाकुल कुंभारे व निखारे परिवाराचे सांत्वन केले.
या शोकसभेला नगरसेवक सतीश विधाते, माजी उपाध्यक्ष प्रकाश ताकसांडे, अरविंद कात्रटवार, जितेंद्र मुनघाटे,पुंडलिक चौधरी,महादेव कुंभारे, किशोर गेडाम,मुख्याध्यापक विवेकानंद हुलके, सतीश पवार, अरुण भादेकर यांच्यासह नातेवाईक व आप्तेष्ट उपस्थित होते.
Back to top button