आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
माओवादमुक्त गडचिरोलीत पोलिसांची अनोखी दिवाळी; ७० पोलीस केंद्रांवर नागरिकांसोबत सण साजरा
अतिदुर्गम बिनागुंडा येथे जवान व नागरिकांसोबत केली दिवाळी; आत्मसमर्पित माओवादी सदस्य

गडचिरोली, प्रतिनिधी :-
माओवादाच्या दहशतीतून मुक्त झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात यंदाची दिवाळी सामाजिक सलोखा, विश्वास आणि विकासाचा संदेश देणारी ठरली. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील एकूण ७० पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे आणि पोलीस मदत केंद्रांमध्ये नागरिकांसोबत ‘माओवादमुक्त दिवाळी’ साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे, पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी अतिदुर्गम बिनागुंडा येथे जाऊन नागरिक व पोलीस जवानांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला.
मे २०२६ मध्ये राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’च्या माध्यमातून जिल्ह्यातील माओवाद संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून शांतता, सुरक्षितता आणि विकासाला चालना देण्यासाठी विविध लोकाभिमुख उपक्रम राबविले जात आहेत. याच सामाजिक बांधिलकीतून ८ नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
दुर्गम भागात वरिष्ठ अधिकाऱ्यांची नागरिकांसोबत दिवाळी
या उपक्रमांतर्गत पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी पोलीस मदत केंद्र बिनागुंडा येथे भेट देऊन तेथील नागरिक आणि जवानांसोबत दिवाळी साजरी केली. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा यांनी गर्देवाडा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांनी उपपोलीस ठाणे पेंढरी, तर अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे. यांनी उपपोलीस ठाणे जिमलगट्टा येथे नागरिकांसोबत दिवाळीचा आनंद घेतला.
जिल्ह्यातील सर्व ७० पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे आणि पोलीस मदत केंद्रांमध्ये संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रभारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना मिठाई आणि फटाक्यांचे वाटप करण्यात आले.
आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसोबतही दिवाळीचा आनंद




