ताज्या घडामोडी
आधारविश्व फाउंडेशनतर्फे स्व. गीता हिंगे यांना आदरांजली
‘माणुसकीचा घास’ उपक्रमातून रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनदान

गडचिरोली, प्रतिनिधी :-
स्व. गीता सुशील हिंगे यांच्या जन्मदिनानिमित्त आधारविश्व फाउंडेशनच्या वतीने विविध ठिकाणी आदरांजलीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच उपक्रमाचा भाग म्हणून जिल्हा महिला रुग्णालय, गडचिरोली येथे ‘माणुसकीचा घास’ या उपक्रमांतर्गत रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनदान करण्यात आले.
दि. १३ ऑगस्ट रोजी आयोजित या उपक्रमासाठी आधारविश्व फाउंडेशनच्या सचिव सुनीता साळवे आणि सदस्य सुचिता धकाते यांनी पुढाकार घेत नियोजन केले. सामाजिक बांधिलकी जपत गरजूंच्या मदतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून स्व. गीता हिंगे यांच्या स्मृतींना मानवसेवेच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी सुशील हिंगे, वर्षा शेडमाके, सीमा कन्नमवार, भूषणा खेडेकर, भारती खोब्रागडे, सुनीता आलेवार यांच्यासह आधारविश्व फाउंडेशनच्या पदाधिकारी व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दरम्यान, ‘माणुसकीचा घास’ हा सामाजिक उपक्रम राबविणारे संजय मेश्राम यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती. स्व. गीता हिंगे यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले की, ‘माणुसकीचा घास’ उपक्रमाने १००१ दिवस पूर्ण केल्याबद्दल आधारविश्व फाउंडेशनच्या वतीने स्व. गीता हिंगे यांनी या सामाजिक कार्याची दखल घेत सत्कार घडवून आणला होता.
स्व. गीता हिंगे यांनी सामाजिक कार्याला दिलेले प्रोत्साहन आणि मानवसेवेची जपलेली भावना यांची आठवण ठेवत आधारविश्व फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या जन्मदिनी राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘सेवेतून स्मृतींना आदरांजली’ देण्यात आली.



