महाराष्ट्र

प्रमाणपत्र पडताळणी समितीला औरंगाबाद हायकोर्टाचा अवमान याचिकेत लाखाचा दंड.

औरंगाबाद,प्रतिनिधी :-

राज्यात गाजत असलेल्या अमरावतीच्या मुजोड जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला अखेर उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादने अवमान याचिकेत लाखाचा दंड ठोठावला आहे.या निर्णयाने मुजोर अधिकाऱ्यांना दणका मिळाला आहे.

रामकृष्ण इंगळे या प्रकरणात औरंगाबाद हायकोर्टाने आदेशित केलेल्या कालावधी मध्ये समिती निर्णय देण्यास टाळाटाळ करीत होते. या कारणामुळे अमरावती पडताळणी समितीच्या सहआयुक्त श्रीमती बोंद्रे व त्यांच्या अन्य सदस्यांना प्रत्येकी ₹ 25,000/-  (एकूण रक्कम ₹1,00,000/-) चा दंड ठोठावला आहे.

एडवोकेट सुशांत येरमवार यांनी न्यायालयाला समितीचा मागील कार्यावर दृष्टीक्षेप टाकून समितीच्या विरोधात नागपूर उच्च न्यायालयात 42 अवमान याचिका दाखल केले आहेत हे लक्षात आणून दिल्यानंतर ही कठोर कारवाई न्यायालयाने केली. शिवाय या चारही अधिकाऱ्यांच्या  झालेल्या दंडाची नोंद सर्विस बुक मध्ये करण्याची विनंती  केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करत तसे आदेशही दिले. वरील आदेशामुळे अमरावती समिती आता तरी वठणीवर येईल आणि ठाकूर समाजावर परत अन्याय करण्याचा विचार करणार नाही. अशी अपेक्षा अनुसूचित जमाती मधून होत आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.