आपला जिल्हाताज्या घडामोडी

गडचिरोलीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गडचिरोलीत शिवसेनेचा भव्य पदाधिकारी मेळावा

गडचिरोली, प्रतिनिधी :-

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने गडचिरोली येथे भव्य पदाधिकारी मेळावा तसेच जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम रविवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा कार्यालय, गडचिरोली येथे होणार आहे.

पक्षाचे सचिव मा. श्री. विनायक राऊत साहेब, माजी विधान परिषद संपर्क प्रमुख मा. श्री. भास्कर जाधव आणि गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख मा. श्री. महेशजी केदारी यांच्या हस्ते जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख मा. श्री. धीरजराजे सातपुते, महाराष्ट्र राज्य विस्तारक युवासेना मा. श्री. शुभमजी सोरते, डॉ. श्रीकांतजी बनसोडे, नंदुभाऊ कुमरे तसेच माजी जिल्हा संपर्कप्रमुख विलासजी टोंद्रे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

“बाळासाहेबांचे विचार—आमची प्रेरणा, उद्धवसाहेबांचे नेतृत्व—आमची ताकद, भगवा झेंडा—आमचा अभिमान” या विचारातून जिल्ह्यात शिवसेना अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात येणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांनी केले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker