आपला जिल्हाताज्या घडामोडी
माजी नगरसेविका राईबाई मेश्राम यांचे निधन

गडचिरोली, प्रतिनिधी :-
नगर परिषद गडचिरोलीच्या माजी नगरसेविका श्रीमती राईबाई कवडुजी मेश्राम यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पश्चात मुले, सुना तसेच मोठा आप्तपरिवार आहे. सौ. मेश्राम यांनी नगरसेविका पदाच्या कार्यकाळात परिसरातील विविध सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले होते.
त्यांचा अंत्यविधी गुरुवार, दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता वैनगंगा नदीवरील बोरमाळा घाट येथे पार पडणार असल्याची माहिती त्यांचे जेष्ठ पुत्र रमेश मेश्राम यांनी दिली आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]



