गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली शहरातील प्रतिष्ठित नागरिक व ज्येष्ठ वैद्यकीय व्यवसायिक प्रकाश पाठक यांचे प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच गडचिरोली शहरात शोककळा पसरली.
मृत्यूसमयी त्यांचे वय ७७ वर्षे होते. ते मेन रोडवरील पाठक मेडिकल स्टोअर्सचे संचालक होते. तसेच ते अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे माजी संघटक म्हणूनही कार्यरत होते. ग्राहक हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन कन्या, जावई तसेच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज नागपूर येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.
स्वर्गीय प्रकाश पाठक यांच्या निधनामुळे गडचिरोलीतील वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia