आपला जिल्हाक्राईम
गडचिरोलीत शहरात गाईचे मांस विकणारा रंगेहाथ सापडला

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली शहरातील इंदिरानगर वार्डात गाईचे मांस विकणाऱ्या वर आज रविवार ला दुपारी १ वाजता धाड टाकून कारवाई करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी नौशाद याला पोलिसांनी अटक केली आहे. काही आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.
गडचिरोली शहरातील इंदिरानगर येथील स्थानिक नागरिकांनी विश्व हिंदू परिषद च्या कार्यकर्त्यांना गाईचे मांस विक्री करत असल्याची माहिती दिली. या माहितीनुसार सापळा रचून गाईचे मांस विक्री करणाऱ्या नौशादला रंगेहाथ पकडण्यात आले.
आरोपी कडून ४० किलो गाईचे मांस जप्त करण्यात आले तसेच घटना स्थळावरून एक टेम्पो वाहन क्रमांक MH 40 बग 9263 जप्त करण्यात आले तसेच त्याची ऍक्टिवा वाहन क्रमांक MH 33 AG 3813 जप्त करण्यात आले तसेच मांस कापण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य तराजु मास ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे कॅरेट ही जप्त करण्यात आले.
सदर गाईचे मांस परीक्षणाकरिता पशुवैद्यकीय दवाखाना गडचिरोली येथे पाठविण्यात आलेले आहे.सदर कारवाई पोलीस उप निरीक्षक शरद मेश्राम यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.
नौशाद वर गाईचे मांस विक्री प्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहे.
इंदिरानगर वार्डातील गाईचे मास विक्री प्रकरणी नौशाद वर आज गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी नौशाद याच्यावर यापूर्वी सुद्धा तीन ते चार ठिकाणी गाईचे मांस विक्री प्रकरणी अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.



