आपला जिल्हा

चंद्रपुरात विद्यार्थ्यांनीचे वसतिगृह पथदिव्यांची अभावी अंधारात

चंद्रपूर,प्रतिनिधी :-

चंद्रपुरात विद्यार्थ्यांनीचे वसतिगृह पथदिव्यांची अभावी अंधारात आहे. हे पथदिवे त्वरित सुरु करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूर येथे विधी चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीचे वसतिगृह असून याठिकाणी विद्यार्थीनी वास्तव्यास आहेत. पथदिव्यांची सुविधा नसल्यामुळे रात्रीच्या वेळेला अंधार असतो त्यामुळे अनुचित प्रकार घडु नये याची खबरदारी म्हणुन याकडे तातडीने लक्ष देत पथदिव्यांची सुविधा करावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूर महानगर च्या शिष्टमंडळाने चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालिवाल यांना केली.

या शिष्टमंडळात अभाविप चंद्रपूर चे जिल्हा संयोजक शैलेश दिंडेवार, महानगर मंत्री रोहीत खेडेकर, स्वाध्याय मंडळ प्रमुख गणेश उपरकर, क्रिडा प्रमुख वेदांत साखुरे यांच्यासह महानगर कार्यकारीणी सदस्य केतन गुरूवाले, सुमित रायपूरे, आकाश गिरी, अमन नुकूम, रितीक कनोजिया यांचा समावेश होता.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker