आरोग्य व शिक्षण

कांग्रेस कमिटी (शिक्षक विभाग) तर्फे  निवेदन

गडचिरोली,प्रतिनिधी :-

         गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या निवारणार्थ आज दिनांक 24/7/2023 रोज सोमवारला प्रशासक तथा गटविकास अधिकारी कार्यालयात सहविचार सभा घेण्यात आली व समस्या निवारणार्थ निवेदन देण्यात आले.

       गडचिरोली जिल्हा कांग्रेस कमिटी (शिक्षक विभाग) गडचिरोली वतीने गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या विषयी सहविचार सभा घेण्यात आली.यात अनेक निर्णय झाले आहे. 

        सहविचार सभेत सातव्या वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते त्वरित अदा करने,4टक्के डी.ए. एरीअर्स मिळण्याबाबत त्वरीत कार्यवाही करने,30जुनला सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांची काल्पनिक वेतनवाढ त्वरित लागू करून देयके अदा करने, सेवानिवृत्त शिक्षकांचे वेतन नियमित वेळेत पाच तारखेच्या आत करने या मागण्याविषयी चर्चा करून हा.धनंजय साळवे प्रशासक तथा गटविकास अधिकारी यांना दत्तात्रय खरवडे जिल्हाध्यक्ष, शिक्षक विभाग जिल्हा कांग्रेस कमिटी गडचिरोली यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले.यावेळी आय.बी.शेख,दिपक रामने, विलास म्हस्के सह बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.

धनंजय साळवे, प्रशासक तथा गटविकास अधिकारी यांनी समस्यांची पुर्तता करण्याचे आश्वासन दिले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker