देश विदेश

जनमिलिशियास गडचिरोली पोलीसांनी केली अटक

1.5 लाख रुपयांचे बक्षीस

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. येथे माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात.  तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कार्यवाह्रांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास काल दिनांक 31/05/2024 रोजी अटक केले.

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 79 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. 

सविस्तर वृत्त असे आहे की, उपविभाग अहेरी अंतर्गत उपपोस्टे पेरिमिली हद्दीतील जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथक, प्राणहिताचे जवान माओवादविरोधी अभियान राबवित असतांना त्यांना सदर जंगल परिसरामध्ये एक संशयित व्यक्ती फिरत असतांना आढळुन आल्याने विशेष अभियान पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्यांनंतर त्याची अधिक सखोल चौकशी केली असता, त्याचे नाव सोमा ऊर्फ दिनेश मासा तिम्मा, वय 23 वर्षे, रा. तोयामेट्टा, तह. ओरच्छा, जि. नारायणपूर (छ.ग.) असे असून, तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच सन 2023 रोजी मौजा हिक्केर जंगल परिसरात झालेल्या पोलीस माओवादी चकमकीच्या अनुषंगाने पोस्टे एटापल्ली येथे दाखल अप. क्र. 13/2023 कलम 307, 353, 341, 143, 147, 148, 149, 120(ब) भादवि, सह कलम 3,4 भास्फोका सहकलम 3/25, 5/27 भाहका सहकलम 135 मपोका सहकलम कलम 13, 16, 18 (अ), 20 युएपीए अॅक्ट मध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास उपविभागीय पोलीस अधिकारी, हेडरी यांच्या ताब्यात देऊन सदर गुन्ह्रात अटक करण्यात आली.

अधिक तपासात असे दिसून आले की, या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन पोलीसांविरुध्द कट रचने, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता.

अटक जनमिलिशिया आरोपीची माहिती      

 नामे सोमा ऊर्फ दिनेश मासा तिम्मा

दलममधील कार्यकाळ

* सन 2020 पासून जनमिलिशीया सदस्य म्हणून काम करीत होता.

*  सन 2020 पासुन गावात राहुन जनमिलिशीया म्हणून माओवाद्यांसाठी राशन आणून देणे, सेंट्री ड¬ुटी करणे, माओवाद्यांचे हत्यार लपवून सुरक्षित ठिकाणी ठेवणे, निरपराध इसमांचे खून करण्याआधी रेकी करुन त्याची माहिती माओवाद्यास पुरविणे, पोलीस पार्टीबद्दल माओवाद्यांना माहिती देणे तसेच माओवाद्यांचे पत्रके जनतेपर्यत पोहचविणे व इतर काम तो करीत होता.

कार्यकाळात केलेले गुन्हे  -07,खुन – 01

        मौजा कुतुल जि. नारायणपूर (छ.ग.) येथील आगुळी वडदा नावाच्या एका निरपराध इसमाच्या खुनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

चकमक – 3

        सन 2020-21 मध्ये मौजा कुतुल जि. नारायणपूर (छ.ग.) जंगल परिसरात सोनपूर जि. नारायणपूर (छ.ग.) पोलीस पार्टीसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. यात दोन माओवाद्यांना ठार करण्यात पोलीस जवानांना यश आले होते.

        सन 2021 मध्ये मौजा दुरवडा जि. नारायणपूर (छ.ग.) जंगल परिसरात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. यात दोन पोलीस जवान शहिद झाले होते. तसेच एक महिला माओवादी हीस ठार करण्यात पोलीस दलास यश आले होते.

        सन 2022 मध्ये मोहंदी जि. नारायणपूर (छ.ग.) गावाजवळील जंगल परिसरात हाकीबोडा पोलीस पार्टीसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

इतर – 03

        सन 2020-21 मध्ये मौजा कोकामेटा जि. नारायणपूर (छ.ग.) गावातील छोटा पुलियावर झालेल्या ब्लास्टींगमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.  यात 04 पोलीस जवान शहिद झाले होेते.

        मौजा मोहंदी जि. नारायणपूर (छ.ग.) रोडवर जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

        मौजा कुतुल जि. नारायणपूर (छ.ग.) रोडवर जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

        शासनाने जाहिर केलेले बक्षीस.

        महाराष्ट्र शासनाने सोमा मासा तिम्मा याच्या अटकेवर 1.5 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांचे मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिताच्या जवानांनी पार पाडली. 

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.