सामाजीक

जिल्ह्यात सत्यसाईंच्या महासमाधी दिन विविध उपक्रमाने साजरा

गडचिरोली,प्रतिनिधी :-

२४ एप्रील हा भगवान सत्यसाईबाबांचा महासमाधी दिवस साईभक्त ‘आराधना’ दिवस म्हणून सर्वत्र पाळण्यात आला. या दिवशी सत्य साईबाबांच्या भक्तांकडून समाजोपयोगी  तसेच आध्यात्मिक उपक्रम मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात राबविल्या गेले.

गडचिरोली जिल्ह्यातील साई भक्तांनी सुध्दा सत्य साईच्या महासमाधीदिनी विविध उपक्रम राबविले. यामध्ये गडचिरोली समिती,अहेरी समितीतील भक्तांनी तसेच टेंभा,वडदा येथील साई भजन मंडळीनी गावात पहाटे ओमकार, सुप्रभात,नगरसंकिर्तन व सध्याकाळी भजन  इत्यादि आध्यात्मिक उपक्रम घेतले. त्याचप्रमाणे गावात महाप्रसादाचे वाटप केले. या महाप्रसादाचा लाभ जवळ जवळ ४१२२ नारायणांनी(लोकांना)  घेतला.

 जिल्हा सत्य साई संघटनेने करमटोला, मसली(वाकडी), मोदुमोडग(आलापल्ली) व चिचगुंडी  या चार गावांना त्याची सामाजिक,आध्यात्मिक ,आर्थिक उन्नती करण्यासाठी दत्तक घेतले आहे. या गावात सुध्दा महाप्रसादाचे गावकऱ्यांना वाटप करण्यात आले.या व्यतिरीक्त चुरचुरा ,कनेरी,मरेगाव येथील साईभक्तानीसुध्दा गावात महाप्रसादाचे वाटप केले.त्याचप्रमाणे गडचिरोली येथील आरमारी रोडवर शितपेयाचे(पन्हायाचे) ७०२ लोकांना वितरीत केले. याप्रसंगी लोक साईभक्तांचा प्रेमळपणा,नम्रता, शिस्तबद्धता पाहून प्रभावित होत होते.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.