आपला जिल्हानिवडणूक

अहेरी – महायुती विरुद्ध भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस 

उदय धकाते 

गडचिरोली :-

राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रमुख पक्षाचे युती आणि आघाडी पाहायला मिळत असताना महायुतीला भाजपा राष्ट्रवादी शिवसेना सेना स्वतःलाच आव्हान दिले आहे.हे चित्र अहेरी मतदार संघात पहायला मिळत असल्याने येथील कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते व नेते हे कुणासाठी प्रचार करत आहेत हेच कळतं नसल्याने महायुतीचे उमेदवार हे प्रचंड दबावाखाली आले आहे. येथे महायुती तुटली आहे.

अहेरी विधानसभा क्षेत्रातून महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे अधिकृत म्हणून रिंगणात आहेत. या ठिकाणी भाजप ला ही जागा न मिळाल्याने भाजपचे माजी राज्यमंत्री राजे अंबरीशराव आत्राम हे नाराज होऊन त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत निवडणूक रिंगणात उतरले आहे. भाजपने यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नसल्याने हे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे राजे अंबरीशराव महाराज आत्राम यांचा नियोजनबद्द प्रचार करीत आहेत.

याच ठिकाणी धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम या वडिलांना आव्हान दिले असल्याने राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. या ठिकाणी बाप – लेक – पुतण्या अशी अविस्मरणीय लढत पाहायला मिळत आहे.

महायुतीचे उमेदवार विरुद्ध या ठिकाणी भाजपा आणि सेना हे प्रचार करीत अपक्ष उमेदवार राजे अंबरीशराव महाराज यांना विजयी करण्यासाठी धडपड करीत आहेत. येथे महायुती विरुद्ध भाजप,राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार समर्थीत उमेदवार हणमंतू मडावी काँग्रेस चे माजी आमदार पेंटा रामा तलांडी यांची कन्या नीता तलांडी या सुद्धा निवडणूक लढवत आहेत. हे सर्व धर्मराव बाबा आत्राम यांना पराभूत करण्यासाठी जिकरीचे प्रयत्न करीत आहे. भाजपने येथे महायुतीचा धर्म मोडला असा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गट करीत आहे.

भाजप आणि काँग्रेसने अद्याप बंडखोरावर कारवाई केलेली नाही आहे.हे विशेष. 

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker