ताज्या घडामोडीदेश विदेश

गडचिरोलीची रेल्वे आरक्षण खिडकी बंद

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी करिता जिल्हा मुख्यालयी आरक्षण पोस्ट ऑफिस मधून सुरु होते. सदर आरक्षण ची खिडकी तीन दिवसापासून सदर कर्मचारी प्रशिक्षणसाठी दोन महिन्याकरिता गेल्यामुळे बंद आहे.यामुळे रेल्वे प्रवासी ग्राहकांना नाहक त्रास होतं आहे.याची गंभीर दखल अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गडचिरोली जिल्हा ने घेतली असून ता बाबत रेल्वे प्रबंधक कडे तक्रार नोंदवली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्याची संख्या मोठया प्रमाणात जिल्ह्यात आहे. सद्या शालेय विद्यार्थी हे सुट्टीच्या काळात जिल्ह्यात लांब हुन रेल्वेने येत असतात. ते शाळा सुरु होतं असल्याने परतीच्या मार्गावर आहेत. तसेच जिल्ह्यातील अनेक नागरिक हेसहलीकरिता  रेल्वेने जात असतात.

परंतु मागील तीन दिवसापासून आरक्षण ची खिडकी बंद असल्याने त्यांचा हिरमोड होतं आहे. 

रेल्वे चे आरक्षण खिडकी लवकर सुरु करण्यात यावी यासाठी अनेकांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे तक्रार केली आहे. याची गंभीर दखल ग्राहक पंचायत, गडचिरोली ने घेतली असून रेल्वे प्रशासन आणि पोस्ट ऑफिस ला निवेदन देण्यात आले आहे. ज्या ग्राहकांची काही बाजारपेठ किंवा अन्य बाबतीत तक्रारी असेल त्यांनी संपर्क करावे.

-उदय धकाते,जिल्हा सचिव,

अखिल भारतीय ग्राहक पंचायत,गडचिरोली.

या बाबत अनेक ग्राहक नागरिकांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे तक्रारी आल्याने आज गडचिरोली उप डाक घर येथे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पतरंगे, जिल्हा सचिव उदय धकाते, आशुतोष कोरडे, तुषार निकुरे यांनी उप पोस्ट मास्तर यांचेशी चर्चा केली. या निवेदन ची गंभीर पणे दखल घेऊन लवकर सुरु करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे. 

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.