आपला जिल्हा

कनेरी येथील घरी शौचालय नसल्याने सदस्यत्व रद्द

गडचिरोली,प्रतिनिधी :-

कनेरी या ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेल्या महिला सदस्याचे ग्रामपंचायत सदस्य रद्द झाले आहे.निव्द्नुकीपूवी त्यांनी शौचालय असल्याचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र रीतसर सादर केले होते.

गडचिरोली शहरापासून जवळच असलेल्या कनेरी या ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेल्या सौ.चंद्रप्रभा घनश्याम कुमरे यांच्या घरी शौचालय नसल्याने तिला अपात्र घोषित केले आहे. सदरची कारवाई दि,२२ जुलै २०२३ च्या आदेशानुसार झाली.

जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत कनेरी सदस्य पदासाठी निवडणूक लढवली व प्रभाग क्र,३ मधून सदर महिला निवडून आली होती. सदर महिलेने निवडणुकीपूर्वी २९/१२ /२०२० रोजी उमेदवारी अर्ज सादर करताना तिचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र रीतसर सादर केले होते, तिच्या घरात शौचालय बांधलेले आहे आणि ती स्वतः आणि तिचे कुटूंब नियमितपणे तिच्या घरातील शौचालयाचा वापर करत आहे.

अजय संजय गेडाम रा. कनेरी या इसमाने सदर महिलेची तक्रार केली  मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांचेकडे सदर महिलेने खोटे प्रतिण्यापत्र सादर केल्याची तक्रार नोंदविली, त्या तक्रारीच्या अनुषंगाने सदर महिला संदर्भात चौकशी करण्यात आली त्या ग्रामपंचायत सदस्य चंद्रभागा कुमरे हिच्या घरी शौचालय नाही असे निष्पन्न झाले व त्या कारणांमुळे महिलेला अपात्र करण्याची आदेश जारी करण्यात आले.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.