ताज्या घडामोडीदेश विदेश

३५० वा शिवराज्याभिषेक” बोधचिन्ह शासकीय कार्यक्रम व शासकीय पत्रव्यवहारावर

मुंबई,विशेष प्रतिनिधी :-

महाराष्ट्र शासनाने एक खूप छान निर्णय घेतला आहे. ३५० वा शिवराज्याभिषेक” निमित्त शासकीय कार्यक्रम व शासकीय पत्रव्यवहारावर बोधचिन्ह वापर करणार असून या बाबत शासन निर्णय काढण्यात आला आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागने हा शासन निर्णय जारी केला आहे.

“३५० वा शिवराज्याभिषेक” निमित्त शिवकालीन मंगल चिन्हे आणि महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणाऱ्या विशेष बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनांमनात व्हावा, जगभरात जेथे जेथे मराठी माणूस आहे तेथे या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तसेच त्यांच्याबद्दलची माहिती पोहोचावी हा या मागील उद्देश आहे. त्यानुषंगाने, राज्य सरकारच्या माध्यमातून वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रचार / प्रसिध्दीत तसेच शासकीय पत्रव्यवहारात सदर बोधचिन्हाचा (Logo) वापर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, या बाबत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे..

शासनाने आदेश देताना म्हटले आहे कि, ३५० वा शिवराज्याभिषेक” निमित्त शिवकालीन मंगल चिन्हे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणाऱ्या परिशिष्ट मध्ये सुनिश्चित केलेल्या विशेष – बोधचिन्हाचा (Logo) शासनाच्या सर्व शासकीय कार्यक्रमाच्या प्रचार / प्रसिध्दीत तसेच शासकीय पत्रव्यवहारांत कटाक्षाने वापर करण्यात यावा. तसेच, सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दर्शनी भागात सदर बोध्दचिन्ह चित्रित करण्यात यावे. सर्व मंत्रालयीन / प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांना सदर बाब निदर्शनास आणून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत योग्य त्या सूचना प्रसारीत करण्यात यावे.

 

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.