आपला जिल्हा

पत्रकार हेमंत डोर्लीकर व संतोष सुरपाम संयोजक पदी

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन (गामा) च्या संयोजकपदी जेष्ठ पत्रकार हेमंत डोर्लीकर व संतोष सुरपाम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

बदलत्या काळानुसार देशभरात “डिजिटल इंडिया” या संकल्पनेनुसार अनेक कामकाज डिजिटल झाली आहेत. त्याच बरोबर दैनंदिन घडामोडी, बातम्या याबाबत डिजिटल मीडियाचा व्यापही मोठ्या प्रमाणात झालेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातही डिजिटल मीडियाचा व्याप मोठ्या प्रमाणात असून डिजिटल मीडिया विषयी नवनवीन धोरण, कार्यप्रणाली, डिजिटल मीडियाशी निगडित पत्रकारांच्या विविध समस्या व मागण्या शासन दरबारी मांडता याव्यात याकरिता गडचिरोली येथे ‘गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन’ या संघटनेची कार्यकारिणी गठीत करून मागील दीड वर्षा पासून नागरिकांचे समस्या मांडण्याचे काम उत्तम प्रकारे करीत आहे.

आजच्या युगातवेगवान आणि ब्रेकिंग न्यूज पोहचविण्याचे माध्यम म्हणून डिजिटल मीडिया कडे बघितले जाते. कोणतीही घटना अथवा बातमी, घडामोडी क्षणात ऑनलाईन प्रकाशित करून जगभरातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचे काम डिजिटल मीडियातील पत्रकार तत्परतेने करित आहे. वाचक वर्गाचा सुद्धा ऑनलाईन न्यूज ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतांना दिसत असून वाचकांचा कलही वाढतांना दिसत आहे.

पत्रकार परिषदांसाठी संपर्क
¶¶¶
१,हेमंत डोर्लीकर (पूर्णसत्य न्युज पोर्टल)
मो.८८३०३४७०८७ ,९४०३९१४९८५

२,संतोष सुरपाम (संतोष भारत न्युज)

९४२०१९०८७७
यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन गामा तर्फे करण्यात आले आहे.

त्यांच्या निवडीबद्दल मनीष कासरलावार (विदर्भ न्युज एक्सप्रेस), प्रवीण चनावार (वृत्तवाणी), जयंत निमगडे (गडचिरोली वार्ता न्युज),अनिल बोदलकर (एबीपी न्युज),उदय धकाते (महाभारत न्युज),संदिप कांबळे (लोकशाही न्युज),किशोर खेवले (लोकप्रवाह न्युज),कैलास शर्मा (महाराष्ट्र माझा न्युज),वेकटेश दुडमवार (गोंडवाना टाइम्स न्युज), बाळू म्हशाखेत्रि (विदर्भ क्रांती न्युज), जगदीश कन्नाके(महाराष्ट्र टुडे न्युज) यांनी अभिनंदन केले आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.