आपला जिल्हा

तब्बल 18,27,000/- रुपयाचा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु जप्त

गडचिरोली,प्रतिनिधी :-

महाराष्ट्र शासनाने सुगंधीत तंबाखु विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध केला असतांना सुध्दा गडचिरोली जिल्हयात शेजारील छत्तीसगड राज्यातुन मोठया प्रमाणात सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणा­यावर अंकुश बसावा या उद्देशाने पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी गडचिरोली जिल्हयातील प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु, अवैध दारु, जुगार व ईतर अवैध व्यवसायांवर रेड करुन प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याची जवाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आलेली जवाबदारी पार पाडत असतांना दि. 02/05/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकास गोपनिय सुत्राकडुन माहिती मिळाली की, मौजा ठाणेगाव येथील गंगाधर चिचघरे हा आपल्या साथीदारांच्या मदतीने छत्तीसगड राज्यातुन मौजा कुरखेडा – वैरागड मार्गे मोठया प्रमाणात प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुची वाहतुक करुन आरमोरी हद्दीतील चिल्लर तंबाखु विक्रेत्यांना पुरवठा करणार असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने सदरची माहिती पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, स्था.गु.शा. गडचिरोली यांना देवुन त्यांचे नेतृत्वात योग्य ते नियोजन करुन पोलीस पथक मौजा वैरागड टी-पार्इंट करीता रवाना करण्यात आले.

मौजा वैरागड टि-पार्इंट चौकात पोलीस पथकातील अंमलदार यांनी सापळा रचुन खबरेतील दोन संशयीत चार चाकी वाहन येत असतांना दिसुन आल्याने सदर वाहनांना तात्पुरता अडथळा निर्माण करुन वाहन थांबवुन वाहनाची तपासनी केली असता दोन्ही वाहनात एकुण 18,27,000/- रुपयाचा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु आरोपी 1) गंगाधर भाष्कर चिचघरे, वय 39 वर्ष, 2) महेश सुधाकर भुरसे, वय 34, 3) सोमेश्वर भाष्कर चिचघरे, वय 36, 4) अमोल अनिल भुरसे, वय 29 सर्व रा. ठाणेगाव ता. आरमोरी, जि. गडचिरोली हे आपल्या ताब्यात बाळगुन वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने त्यांच्या विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याकरीता अन्न व प्रशासन विभाग,गडचिरोली यांचे ताब्यात देण्यात आले.

        सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, स्था.गु.शा. गडचिरोली यांच्या नेतृत्वात सहा.फौ. नरेश सहारे, पोहवा अकबरशहा पोयाम, पोअं प्रशांत गरफडे, पोअं श्रीकृष्ण परचाके, पोअं श्रीकांत बोइना, चापोअं दिपक लोनारे यांनी पार पाडली.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.