ताज्या घडामोडी
कारगील चौकात भीषण अपघात,महिला गंभीर

गडचिरोली,प्रतिनिधी :-
कारगील चौक गडचिरोली येथे आज रात्री पिकअप ने दुचाकी स्वाराला उडविल्याने लग्न सोहळा आटोपून घरी परतणाऱ्या महिला हि गंभीर जख्मी झाली आहे. तिच्या डोक्याला जबर मार लागला आहे.
कारगील चौक येथे नादुरुस्त ट्रॅक्टर ट्रॉली पिकअप ला बांधून नेट असताना दुचाकी वाहन चालकाला उडविले. महिला गंभीर जख्मी झाली असून तिच्या डोक्याला मार लागला आहे. मागील वर्षी १ मे २३ ला कारगिल चौकात एका युवाकाला ट्रस्ट ने चिरडले होते. एक वर्षानंतर परत हा अपघात झाला. शहरातील अतिक्रमण कडे प्रशासनाचे दुर्लक्ष हे जीवघेणी ठरत आहे.

सदर महिला लग्न सोहळा आटोपून घरी जात होती. तिला नागरिकांनी उपचारासाठी अन्य वाहणाने पाठविले.

घटनास्थळी वाहन चालकाला नागरिकांनी पकडून ठेवले.पोलिसांच्या हवाली त्याला हवाली केले. वाहन चालकाची चूक असल्याचे प्रत्यदर्शी ने सांगितले.




