आपला जिल्हा

झाडीपटटीतील कलावंतानी अभिनय कला अविरत जोपासावी- पद्मश्री डॉ. परशुराम खुणे

विदर्भ स्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा उत्साहात

गडचिरोली,प्रतिनिधी :-

झाडीपटटीत अभिनयाच्या बाबतीतच नव्हे तर गायन, वादन, नृत्य, लावणी, गोंधळ, पांगुळ, अश्या अनेक कला व लोककला जोपासणारे हिरे आहेत. गडचिरोली जिल्हयात सुध्दा हि-याची खाण आहे असे म्हणने वावगे होणार नाही. कारण मुंबई पुण्यातील कलावंता पेक्षा गडचिरोलीतील कलाकार हा कोणत्याही बाबतीत कमी नाही. त्यामुळे प्रत्येक नवोदितांनी एक तरी कला अविरत जोपासावी असे प्रतिपादन झाडीपटटी रंगभूमीवर अर्धशतक गाजविणारे डॉ. परशुराम खुणे यांनी अध्यक्षीय भाषनातुन दिले. तसेच गडचिरोलीत नाटयगृह नसल्यामुळे कलाकार तसेच प्रेक्षक दर्जेदार कार्यक्रमापासून उपेक्षित राहीलेला आहे. गडचिरोली येथे नाटयगृह बांधकामासाठी मागणी करा मी आपल्यासोबत राहून योग्यतो पाठपुरावा करीन असे सांगीतले.

राजवी प्रॉडक्शन मित्र परीवार गडचिरोली तर्फे आयोजित स्वर्गीय गजुभाऊ ऊर्फ विवेक काशिराम चडगुलवार यांचे स्मरणार्थ विदर्भ स्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेच्या उदघाटन पर कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते. उदघाटक स्थानी प्रा. नरेंद्र आरेकर हे होते. तर प्रमुख अतिथि म्हणून दामदेव मंडलवार सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक, काशिरामजी चडगुलवार से.नि. उच्चश्रेणी मुख्याध्यापक, वामनराव सावसाकडे, डॉ. उमेश पी. समर्थ, मारोतराव इचोडकर, सुनिल चडगुलवार, जेष्ठ नाटय कलावंत, भास्कर मेश्राम, प्रविण मुक्तावरम हे होते. एकपात्री अभिनय स्पर्धेकरीता विदर्भातील २२ पुरुष व महिला कलावंतांनी हजेरी लावलेली आहे. हयांचे मधुनच नवोदित उत्कृष्ट कलावंत निर्माण होतील असा विश्वास मला आहे. त्यामुळे राजवी प्रॉडक्शन मित्र परीवार यांनी त्यांचे कार्य सतत सुरु ठेऊन कलावंताना रंगमंच उपलब्ध करुन त्यामधुन अनेक कलावंत घडविण्याचे मोलाचे कार्य करावे असे उदघाटक स्थानावरुन बोलतांना प्रा. नरेंद्र आरेकर म्हणाले.

कार्यक्रमाचे सुरुवातीला राजवी प्रॉडक्शन तर्फे झाडीपटटीतील सर्वोत्कृष्ट कलावंत म्हणून पदमश्री डॉ. परशुराम खुणे यांचा तसेच प्रा. नरेंद्र आरेकर यांचा शाल, श्रीफळ, गौरवपर सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यांत आला. मारोतराव इचोडकर यांनी सुरेल आवाजात महाराष्ट्र गित व विजया पोगडे यांनी नांदी सादर केली. सदर स्पर्धेत ११ महिला व ११ पुरुष कलावंतांनी सहभाग घेतला.

एकपात्री अभिनय स्पर्धेचे परिक्षक म्हणून झाडीपटटी रंगभूमीवरील कलावंत संतोष कुमार, मुकेश गेडाम व मनिषा मडावी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक सुनिल चडगुलवार, संचालन प्रविण मुक्तावरम व आभार डॉ. राकेश चडगुलवार यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संजय धात्रक सर, दिलीप मेश्राम, बाबाराव नक्षीणे, नामदेव इजनकर, अविनाश चडगुलवार, राकेश मारगोनवार, उदय धकाते, मनोज पवार, चुडाराम बल्हारपूरे, दादाजी चुधरी, जितेंद्र उपाध्याय, खुशरंग शेंडे, नामदेव इजनकर, रामकृष्ण ताजणे सर, रमेश नक्षीणे, मधुकर विधाते, विजय गिरसावळे, जगदीश मडावी,मनिषा मडावी, दिपक चडगुलवार, विनोद मारकवार, चैतन्य चडगुलवार यांनी सहकार्य केले.

विविध गटातील पुरस्कार विजेते….

पुरुष गटातुन प्रथम क्रमांक राज मराठे गडचिरोली, व्दितीय क्रमांक राजेंद्र चिलगेलवार गडचिरोली, तृतीय क्रमांक महेंद्र गोंडाणे गोसीखुर्द, महिला गटातुन प्रथम क्रमांक किमया के. खोब्रागडे मुल, व्दितीय क्रमांक सुनिता आनंद तागवान आरमोरी, तृतीय क्रमांक उषाताई मुळे कनेरी, प्रोत्साहनपर पुरस्कार धनंजय ढवळे लाखांदुर, विक्की वासुदेव मेश्राम, खरपुंडी, इशा मुनगेलवार चामोर्शी, साक्षी दिलीप उईके, देसाईगंज, लता निंदेकर मुल यांनी पटकाविला.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker