आपला जिल्हा

२२ ऑगस्टला गडचिरोली येथे कुणबी मेळाव्याचे आयोजन

विश्रामगृहात कुणबी  समाज बांधवांची बैठकीत निर्णय 

गडचिरोली, प्रतिनिधी :-

कुणबी समाज बांधव व आमदार डॉक्टर देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने २२ ऑगस्ट २०२४ रोजी सेलिब्रेशन (फंक्शन) हॉल चामोर्शी रोड गडचिरोली   येथे दुपारी २ वाजता कुणबी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याला कुणबी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कुणबी समाज बांधव व आमदार डॉक्टर देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

समाजातील गुणवंत विद्यार्थी व नवनियुक्त पोलिस व अधिकारी नियुक्त झालेल्यांचा सत्कार होणार आहे.

आमदार डॉ. देवराव होळी

कुणबी समाज बांधवांच्या वतीने गडचिरोली येथील विश्रामगृहात या मेळाव्याच्या नियोजना संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला आमदार डॉक्टर देवरावजी होळी,  जगदीश पाटील मस्के, रामरतन गोहणे,  कविताताई उरकुडे , घनश्यामजी म्हस्के,  अर्चना बोरकुटे, अनुरथ निलेकार, वासुदेवजी बट्टे, राजू खंगार, हेमंत बोरकुटे ,प्रशांत कोटगले,  मनोज उरकुडे, सुधाकर  बाबनवाडे,  हेमंत बानबले ,रुपेश चुधरी, सुषमाताई डोईजड, दिलीप मस्के, यांचेसह समाज बांधव उपस्थित होते.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.