महाराष्ट्र

निवृत्त शिक्षक विरोधात आंदोलनाने “जिल्हा परिषद मध्ये खळबळ”

गडचिरोली, प्रतिनिधी :-

प्रशासनाने नियुक्त केलेले निवृत्त शिक्षक आज जिल्हा परिषद मध्ये समुपदेशना करीता आले असता आझाद समाज पार्टी आणि काही बेरोजगार तरुण तरुणीनी निवृत्त लोकांना जिल्हा परिषदेच्या गेट वर थांबवून त्यांची चांगलीच झडती घेतली या मुळे निवृत्त शिक्षका मध्ये खळबळ माजली.

यावेळी बेरोजगारांचे शोषण करणाऱ्याच्या यादीत तुमचे नाव असणार आहे असे आरोपही करण्यात आला.

बेरोजगारांवर अन्याय केल्या बद्दल त्यांचे फुल देऊन अभिनंदन करण्यात आले.

जेणेकरून किमान त्या 50 हजार पेन्शन भेटणाऱ्या लालची भिकारी शिक्षकांना शरम वाटून नियुक्ती पत्र घेऊ नये म्हणून विविध प्रकारे नारे लावून त्यांचा निषेध करण्यात आला.

सेवानिवृत्त शिक्षकांच्या थेट सभागृहात ASP च्या कार्यकर्त्यांनी वाटले आवाहन पत्र.

पत्रक वाचून शरम वाटेल तर निवृत्त शिक्षकांनी अर्ज स्वीकारू नये.

पुनर्नियुक्ती घेणाऱ्या शिक्षकांची पेन्शन बंद करण्याची आझाद समाज पक्षाची मागणी.

यावेळी अतिशय अनोखे व रास्त मागणी म्हणून जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष आंदोलनाने वेधले व अनेकांनी आंदोलनाचे कौतुक केले.

विशेष म्हणजे नियुक्ती घेणाऱ्या या शिक्षकांमध्ये स्वतःला पुरोगामी म्हणवीणारे आणि समाजात अन्यायाविरोधात लढण्याचा ढोंग करणारे बरेच कर्मचारी होते. जर त्यांनी नियुक्तीचा त्याग नाही केला.तर लवकरच त्यांच्या नावासहित त्यांची पोलखोल केल्या जाईल असा इशारा आझाद समाज पार्टी ने दिला.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.