आपला जिल्हा

चामोर्शी येथे माळी समाज बांधवांचा मेळावा उत्साहात 

गडचिरोली, प्रतिनिधी :-

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी माळी समाजाच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्न केले असून ते माळी समाजावर विशेष प्रेम करणारे व्यक्ती आहेत त्यामुळे माळी समाज नक्कीच त्यांच्या पाठीशी मोठ्या शक्तीने उभा राहील असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, माळी समाजाचे नेते भैय्याजी वाढई यांनी तेली समाज सभागृह चामोर्शी येथे आयोजित माळी समाज बांधवांच्या मेळाव्या प्रसंगी केले.

यावेळी मंचावर आमदार डॉक्टर देवरावजी होळी माळी समाजाचे गजाननजी आदे, अल्काताई ठाकरे, विठ्ठल वाडगुरे, भालचंद्र वाढई, विठ्ठल बोरुले, छायाबाई मांदाडे, उष्टुजी शेंडे, दीपक मोहुर्ले, दिवाकर निकोडे, योगेश शेंडे यांचे सह मान्यवर उपस्थित होते.

माळी समाज बांधव व गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या वतीने चामोर्शी येथे माळी समाज बांधवांचा मेळावा त्यामुळे चामोर्शी आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला तालुक्यातील लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दर्शविली.

यावेळी आमदार महोदयांनी मेळाव्याला उपस्थिती दर्शवून आपल्यावर प्रेम व्यक्तकरणाऱ्या माळी समाज बांधवांचे आभार मानले . माळी समाजाचे प्रेम आपल्यावर असेच वृद्धिंगत होत राहो अशी प्रार्थना ही त्यांनी समाजाला केली. माळी समाजाच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत असून यापुढेही समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर राहू असे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या मेळाव्याप्रसंगी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करताना केले.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.