महाराष्ट्र

1950 पूर्वीच्या ठाकूर नोंदीवर जातवैधता देण्याचे आदेश    

औरंगाबाद,विशेष प्रतिनिधी :-

आज दिनांक 21.07.2023 रोजी औरंगाबाद उच्च न्यायालयात घरात कोणाचीही वैधता नसताना फक्त 1950 पूर्वीच्या ठाकूर नोंदीवर विना अट 4 जणांना वैधता देण्याचे आदेश देण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयचे स्वागत करण्यात येत आहे.                         

आदिवासी असलेले ठाकूर जमातीच्या चार याचिकावर अँड. सुशांत येरमवार यांनी वैधता प्रमाणपत्र हे घरात कोणत्याही सदस्यांची ही वैधता नसताना मिळवून दिली आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मंगेश एस.पाटील आणि शैलेश पी.ब्राह्मे यांच्या खंडपीठा समोर सुनावणी झाली. यावेळी न्यायमूती यांनी न्यायालयात घरात कोणाचीही वैधता नसताना फक्त 1950 पूर्वीच्या ठाकूर नोंदीवर विना अट 4 जणांना वैधता देण्याचे आदेश दिले आहे.   

पराग वानखेडे याचिका क्र. 11111/2022, हर्षदा ठाकूर याचिका क्र. 8911/2022, दीपक ठाकूर याचिका क्र. 8668/2019, स्वप्नील ठाकूर याचिका क्र. 8538/ 2023 स्वप्नील ठाकूर.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.