निधन

सुप्रसिद्ध नाटककार वडपल्लीवार गुरुजी यांचे निधन

आरमोरी,प्रतिनिधी :-

जिल्ह्यातील झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध नाटककार, राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक गणपती वडपल्लीवार गुरुजी यांचे आज दुपारी ३ वाजता निधन झाले.

पेंढरी कोकेवाडा जि. चंद्रपूर येथे संपन्न झालेल्या २३ व्या  झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध नाटककार, राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक गणपती वडपल्लीवार गुरुजी यांचे आज आरमोरी (जिल्हा -गडचिरोली) येथे आपल्या निवासस्थानी दुपारी ३वाजता दुःखद निधन झाले.

उद्या दुपारी ११ वाजता आरमोरी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या रूपाने जिल्ह्याने झाडीपट्टीचे उत्तम नाटककार, नाट्यमंडळाचे संघटक, प्रसिद्ध नट गमावला आहे. त्यांच्या निधनाने झाडीपट्टीत पोकळी निर्माण झाली आहे.

केंद्रीय झाडीबोली साहित्य मंडळ व राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन समिती च्या वतीने त्यांना श्रदांजली वाहण्यात आली आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker