आपला जिल्हानिधन
एसआरपी भरतीदरम्यान तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू
वडसा, प्रतिनिधी :-
देलोडा येथील आशिष भास्कर पाटील म्हशाखेत्री (वय अंदाजे २२-२४) यांचा आज दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी एसआरपी भरती प्रक्रिये दरम्यान वडसा येथे हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष नुकताच पोलीस भरतीसाठी पात्र ठरला होता व त्याचे नाव राखीव यादीत असल्याची माहिती समोर आली आहे.आज एस आर पी च्या भरती प्रक्रियेच्या दरम्यान अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
आशिष हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अकाली निधनामुळे देलोडा परिसरासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत आशिष यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ५ वाजता देलोडा बुज येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]



