आपला जिल्हाताज्या घडामोडी
बांडीया नदीवरील मोठया पुलावरुन जडवाहतूक बंद

गडचिरोली,प्रतिनिधी :-
गत सात दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसासह अतिवृष्टी झाली असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तळोधी आमगाव देवरी भाडभिडी रेगडी बोलेपल्ली चंदनवेली एटापल्ली परसलगोंदी गटटा (रा.मा.३८२) ता. एटापल्ली. जि. गडचिरोली वरील सा.क्र.७९/३८० वर बांडीया नदीवरील मोठया पुलावरुन जडवाहतूक आज रात्री ९ वाजता पासून करण्याचा आदेश जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दिला आहे.
मागील सात दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पाऊसामुळे दि.१९.०७.२०२३ ला तळोधी आमगाव देवरी भाडभिडी रेगडी बोलेपल्ली चंदनवेली एटापल्ली परसलगोंदी गटटा (रा.मा.३८१) ता.एटापल्ली जि. गडचिरोली वरील सा.क्र.७९/३८० वर वांडीया नदीवरील मोठा पूल पुर्णतः पाण्याखाली होता त्याअनुषंगाने दि. २१.०७.२०२३ रोजी कार्यकारी अभियंता सा. वा. विभाग आलापल्ली यांचे द्वारे प्रत्यक्ष स्थळ पाहणी नुसार सद्यास्थितीत पुलावरुन अवजड वाहतुक सुरु असतांना कंपण जाणविले असल्याचे अहवाल द्वारे जिल्हा प्रशासनाला कळविले असुन या स्थितीत पुलावरून अवजड वाहतुक सुरु राहिल्यास अनुचित दुर्घटना होऊन जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती व्यक्त केली.
पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने व नागरिकांच्या सुरक्षेकरिता जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे ३०(२) अन्वये पूरपरिस्थितीवर उचित प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत तळोधी- आमगाव- देवरी भाडभिडी रेगडी- बोलेपल्ली- चंदनवेली एटापल्ली- परसलगोंदी- गटटा (रा.मा.३८९) ता. एटापल्ली जि. गडचिरोली वरील सा.क्र.७९ / ३८० वर बांडीया नदीवरील मोठया पुलावरुन जडवाहतूक दिनांक २१ जुलै, २०२३ चे रात्रौ ९.०० ते पुढील आदेशापर्यंत तात्काळ प्रभावाने बंद करण्याचे आदेश दिले आहे.
सदरील आदेशाचे पालन न करणारी व उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे असे आदेशात स्पष्ट केले आहे.




